Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे पैसे जमा होण्यास तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे आधार लिंकसाठी राष्ट्रीयकृत बँक सुरू होण्याच्या अगोदरच गेटसमोर रांगा लागत आहेत. त्यात बँकांमध्ये असलेल्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे लाडक्या बहिणींना रांगेत दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.