Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी रॅलीत राऊतराय दाम्पत्याने वाटले तब्बल इतके हजार झेंडे

Maratha Reservation: प्रत्येक दुचाकी व चार चाकी ला भगवा झेंडा देण्याचा संकल्प
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी रॅलीत राऊतराय दाम्पत्याने वाटले तब्बल इतके हजार झेंडे
Manoj Jarange Patilsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर येथे आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव शहरात हळूहळू दाखल होत आहे.

टीव्ही सेंटर परिसरात छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर उमा संतोष राऊतराय व संतोष राऊतराव या दांपत्याने मोठे झेंडे एक हजार तर छोटे झेंडे दीड हजार असे एकूण अडीच हजार झेंड्यांचे मराठा समाज बांधवांना मोफत वाटप केले.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी रॅलीत राऊतराय दाम्पत्याने वाटले तब्बल इतके हजार झेंडे
Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व, संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ

फुलंब्री तालुक्यातील मूळ निधोना गावच्या असलेल्या उमा संतोष राऊतराय व संतोष राऊतराय या पती-पत्नीने सकाळपासूनच आपला ठेला जळगाव महामार्गावर ठेवला होता. टीव्ही सेंटर परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत झेंड्याचे या दांपत्याने वाटप केले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महा शांतता रॅलीत जाणारे प्रत्येक वाहन या ठिकाणी थांबवून झेंडा घेत होते.

बघता बघता मोठी गर्दी या परिसरात झाली होती. फुलंब्री , सिल्लोड , सावंगी, हरसुल यासह शहरातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी होत होते. या झेंड्याच्या ठेल्या जवळ जाऊन गाडीचा ब्रेक लावल्या जात होता. मोफत झेंडा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्या दुचाकीला व चार चाकी वाहनाला झेंडा लावून सदरील गाडी पुढे सिडको बस स्थानकाकडे रवाना होत होत्या. त्यामुळे सुमारे अडीच हजार झेंड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी रॅलीत राऊतराय दाम्पत्याने वाटले तब्बल इतके हजार झेंडे
Manoj Jarange Patil : पोलिसांनी थांबवली रॅलीतील बैलगाडी, संतप्त मराठा आंदोलकांची पोलिसांशी हुज्जत

समाजाच काही देणे लागते म्हणून झेंडे मोफत वाटपाचे नियोजन आम्ही पती-पत्नीने केले होते. या महा शांतता रॅली जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा राहावा अशी मनोमणी इच्छा होती. त्यामुळे मोठे एक हजार व छोटे दीड हजार अशा अडीच हजार झेंड्यांचे मोफत वाटप केले. त्यामुळे मन समाधानी झाले.

- उमा संतोष राऊतराय

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी रॅलीत राऊतराय दाम्पत्याने वाटले तब्बल इतके हजार झेंडे
Manoj Jarange : मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ,जरांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com