Navratri 2024 : भक्ती अन् शक्तीचा आजपासून जागर

Chhatrapati Sambhajinagar Navratri 2024 : शारदीय नवरात्रोत्सवाची आजपासून घटस्थापनेने सुरुवात होत आहे. यंदा नवरात्र दहा दिवसांची असून देवी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar Navratri 2024
Chhatrapati Sambhajinagar Navratri 2024 sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. तीन) प्रारंभ होत आहे. घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. यंदा नवरात्र दहा दिवसांची असून, देवी मंदिरांमध्ये या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या उत्सवासाठी देवी मंदिरांचा परिसर सजविण्यात आलेला आहे. गुरुवारी (ता. तीन ) ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटेपासून ते दुपारी १.४५ पर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे.शारदीय नवरात्र नऊ दिवसांचा असतो, मात्र यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा आहे. याविषयी रामकृष्ण बाणेगावकर गुरुजी म्हणाले, यंदा अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र नऊऐवजी दहा दिवसांची आहे.

सोमवारी (ता. सात) ललिता पंचमी, गुरुवारी (ता. दहा) महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे), शुक्रवारी (ता. ११) महाष्टमी व नवमी उपवास आणि शनिवारी (ता. १२) दसरा आहे. ज्यांना पूर्ण नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल, त्यांनी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. तेही शक्य नसेल, तर किमान अष्टमीचा उपवास करावा, असेही त्यांनी सांगितले.

घटस्थापनेच्या महत्त्वाविषयी ज्योतिर्विद सूरज केवट म्हणाले, घटस्थापनेमुळे सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने वास्तूदोष दूर व्हावेत, यासाठी नवरात्रीत पंचमहाभूतांचे प्रतीक असणारा घट घरोघरी बसविला जातो. देवीच्या आगमनाबरोबर घरात नवचैतन्य, उत्साह, ऊर्जेचा समावेश होतो. वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी म्हणाले, त्या त्या वारानुसार देवी त्या-त्या वाहनावर येत असते. यावर्षी गुरुवारी नवरात्र आरंभ होत आहे. त्यामुळे देवीचे वाहन पालखी आहे.

रेणुकामाता मंदिरांमध्ये आजपासून महोत्सव

एन-९, जळगाव रोड, सिडको-हडको येथील रेणुकामाता मंदिरांमध्ये श्री रेणुकामाता महोत्सवानिमित्त ता तीन ते ता. १२ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी साडेसातला आणि सायंकाळी साडेसातला महाआरती, सकाळी नऊला भजन, दुपारी एकला दुर्गा स्तोत्र आदी कार्यक्रम असतील. दुपारी देवी भागवत कथेस ग्रंथदिंडीने सुरू होईल व दररोज देवी भागवत असेल. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती होईल. ता. सात ऑक्टोबरला कुंकुमार्चन होईल. ता. नऊ ऑक्टोबरला देवी भागवत कथा समाप्ती, ता. दहा ऑक्टोबरला होमहवन आदी कार्यक्रम होतील.

देवीचे पहिल्या दिवशीचे शैलपुत्री रूप

नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. हा दिवस पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजन केले जाते. शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या. तिचे वाहन वृषभ (बैल) असून, उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात कमळ धारण केलेले आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट व अर्धचंद्र धारण केलेले आहे. देवी पूर्वजन्मीची सती होती. तिने कठीण तपस्येद्वारे शंकराला प्रसन्न करून पती स्वरूपात प्राप्त करून घेतले.

आजचा नैवद्य

  • शुद्ध तूप. याचे फळ ः आरोग्य उत्तम राहते.

  • या दिवशी कुमारिका पूजनाचे फळ ः ऐश्वर्यप्राप्ती.

  • अर्पणद्रव्य ः सुगंधी आवळ्याचे तेल.

  • पहिली माळ ः शेवंती आणि पिवळ्या फुलांची माळ.

कर्णपुरा यात्रेची तयारी पूर्ण

छत्रपती संभाजीनगर ः ग्रामदैवत कर्णपुरा येथील तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवाच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. सनई-चौघड्यांच्या गजरात गुरुवारी घटस्थापना करण्यात येणार आहे. यासह या यात्रेचे आकर्षण असलेले रहाटपाळणे, मौत का कुंवा लावण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. नवरात्रोत्सवाला सकाळी सातला मंदिर संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात येईल.

२) शुक्रवार ४ ऑक्टोबर हिरवा

३) शनिवार ५ ऑक्टोबर राखाडी

४) रविवार ६ ऑक्टोबर केशरी

५) सोमवार ७ ऑक्टोबर पांढरा

६) मंगळवार ८ ऑक्टोबर लाल

७) बुधवार ९ ऑक्टोबर निळा

८) गुरुवार १० ऑक्टोबर गुलाबी

९) शुक्रवार ११ ऑक्टोबर जांभळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()