छत्रपती संभाजीनगर : कालिचरण महाराज यांची शहरातील बीड बायपास परिसरात रविवारी (ता.१७) हिंदू जनजागरण महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान त्यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन ‘सकल मराठा समाज’ संतप्त झाला असून कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.