माजलगाव : लाडकी बहीण योजनेमुळे खुश झालेल्या बहिणी आता जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे रूसल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे वाढत असलेले दर आणि भाजीपाल्याचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने बहिणीचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारात तारेवरची कसरत करावी लागत आहे.