Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम

Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम
Updated on

वडीगोद्री: सरकार मराठा समाजाला धोका देत आहे समाजाने एकत्र राहून लढा सुरू ठेवावा., गरीब, राजकीय, नोकरदार या सहन सर्वांना मराठ्यांना आरक्षण मिळावं, असं वाटतं. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघत आहे, आम्हाला राजकारणात जायचे नाही आरक्षण देण्याची तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नादी लागून नुकसान करून घेऊ नका, आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण द्या, आरक्षण नाही मिळाले तर तुमच्या निवडणुकीचे गणितं बिघडले जातील, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

जरांगे यांनी 16 तारखेपासून सुरु केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी बुधवार, दि. 25 रोजी सायंकाळी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, महिलांच्या हस्ते फळाचा रस घेऊन स्थगित केले जाणार आहे. असे मनोज जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना सांगितले.

Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम
Manoj Jarange: ''महाराष्ट्रात जातीयवाद कुणी पसरवला? मी? मग 'माधव पॅटर्न' कुणी राबवला?'' मनोज जरांगेंचा थेट हल्ला

या वेळी बोलतांना जरांगे यांनी सांगितले की, मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यामुळे सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे. समाजाने शांतता राखावी, आरक्षण नाही दिले तर मग सत्तेत जाऊन घ्यावे लागेल. सध्या वाद न करता शांततेत आंदोलन करा, सलाईन घेऊन पडून राहाणे मला योग्य वाटत नाही.

जरांगे म्हणाले की, मंगळवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी आंदोलनाला भेट दिली. न्यायालयाने देखील तब्येतीची काळजी घेण्यासाठी उपचार घेण्याचे सांगितले.. मी न्यायालयाचा उपस्थित जनतेचा सन्मान करत सलाईन घेतले आहे.

''मला सलाईन लावल्यावर काही होणार नाही पडून राहिलो तर समाजाच्या लोकांचे पावसा-पाण्यामुळे हाल होतात हे बघवले जात नाही. फडणवीस साहेब आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, सगेसोयरे कायदा, गॅझेट लागू करा, सरसकट गुन्हे वापस घ्या.. या पुढे नेत्याच्या सभेला जायचं नाही आचारसंहिता लागेपर्यंत सरकारने आरक्षण द्यावे.'' अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.