Latest Marathwada News: अंतरवाली सराटी येथे पाच दिवसापासून मराठा आरक्षण करीता मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहे शुक्रवारी मध्यरात्री जरांगे यांची तब्येत खालावली होती या ठिकाणी मंत्री शंभूराजे देसाई यांनी फोनवर चर्चा केल्यावर व उपस्थित नागरिक यांच्या विनंतीवरुन मनोज जरांगे यांनी वैघकिय उपचार ( सलाईन) लावली आहे .
मराठा आरक्षण व मागणी बाबत आपल्या भूमिकेवर जरांगे ठाम आहे ता.17 पासून त्यांनी आपले सहावे आमरण उपोषण या ठिकाणी चालू केले आहे त्यांच्या उपोषणाचा शनिवार ता.21 रोजी पाचवा दिवस आहे.