Manoj Jarange: ..तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो; अंतरवाली सराटीच्या मार्गावर बॅरिकेड्स लावल्याने जरांगेंचा पोलिसांना इशारा

Manoj Jarange patil agitation Fifth Day: वडिगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमनेसामने आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी झाली.
Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

जालना- अंतरवाली सराटी आणि वडिगोद्रीमध्ये रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वडिगोद्रीमधून अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हे बॅरिकेड्स काढले आहेत. वडिगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमनेसामने आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी झाली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये येत आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मार्गावर बॅरिकेडिंग केलं होतं. पण, जरांगे पाटील यावर आक्षेप घेतला. आमच्याच गाड्या का अडवता? असा सवाल जरांगेंनी पोलिसांना केला होता.

Manoj Jarange
Manoj Jarange: सहाव्यांदा उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या मागण्या मान्य होणार का?; गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

बॅरिकेडिंग केल्यानं जरांगे पाटील आक्रमक झाले होते. गेट १५ मिनिटात काढले नाही तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असं जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी रात्री शंभुराजे देसाई आणि दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवर संपर्क झाला आहे. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तात्काळ बेरिकेडिंग काढली आहे. मात्र, तणाव पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस फौडफाटा तैनात करण्यात आला आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil: आरक्षण द्या, मी राजकीय भाषा बोलण बंद करेन; उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काय म्हणाले जरांगे पाटील?

जरांगे यांची तब्येत बिघडली होती. शंभुराजे देसाई यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतला आहे. त्यांचा मान राखण्यासाठी आजचा दिवस मी सलाईन लावून घेतला आहे, असं ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव आणि बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याशिवाय शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात बंदची हाक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवार दिनांक 22 तारखेला पुणे जिल्हा बंदची मराठा समाजाने हाक दिली आहे. पुणे जिल्हा बंद करून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. अखंड मराठा समाज पुणेच्या वतीने बंदची हाक देण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.