Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला पुन्हा दिला अल्टिमेटम

Manoj Jarange Patil fast agitation suspended: मी आता उपोषण करण्यावर ठाम नाही. कारण, समाजाचा हट्ट आहे, की मी उपोषण मागे घ्यावं. आरक्षण हवंय तसं तुम्ही देखील हवे आहात असं समाजाचं म्हणणं आहे, असं जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Updated on

जालना- मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला दिलेला वेळ १३ ऑगस्ट रोजी संपत आहे. तोपर्यंत सरकारला वेळ देत आहे. तोपर्यंत त्यांनी आरक्षण द्यावं. मी आता उपोषण करण्यावर ठाम नाही. कारण, समाजाचा हट्ट आहे, की मी उपोषण मागे घ्यावं. आरक्षण हवंय तसं तुम्ही देखील हवे आहात असं समाजाचं म्हणणं आहे, असं जरांगे म्हणाले.

कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटतं की कोणत्या तोंडाने यावं. त्यांनी मराठ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असलं बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नसतं. हा फक्त वेळकाढूपणा झाला. सलाईन लावून पडण्यात काही उपयोग नाही. समाजाचा प्रचंड दबाव आहे. वेळ लागला तरी चालेल पण तुम्ही देखील आम्हाला हवे असल्याचं समाज म्हणत आहे. त्यामुळे उपोषण थांबवत आहे, असं जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट, काय आहे प्रकरण?

समाजाचा हट्ट माझ्यासमोर भयानक आहे. तुम्ही असाल तरंच समाजाची एकजूट राहील अशी समाजाची भावना आहे. रात्री विनंती केल्याने मी सलाईन लावलं. मी कितीही विरोध केला तरी त्यांनी मला सलाईन घेण्यास लावलं. पण, अशा पद्धतीने उपोषण काही कामाचं नाही. आता एक-दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरु करेन. सलाईना लावून उपोषण करण्यास मी तयार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

मी इथे झोपून कशाला वेळ घालू. त्यापेक्षा मला राज्यात फिरता येईल. सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. पण, असं झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : 'शिंदे-शरद पवारांमध्ये काय चर्चा झाली माहित नाही, पण आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही'

सरकारला तोंड दाखवायला जागा नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत. मला सलाईनशिवाय उपोषण करू द्यावं तेव्हा मी यांना दाखवतो. पण, समाज यासाठी तयार नाही. १३ ऑगस्टपर्यंत सरकारने उपोषण द्यावे. नाहीतर मी त्यांना काय दाखवायचं ते दाखवतो, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.