बीड : सरकार नालायक आहे, सरकाला सांगून उपयोग काय. तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र, असंवेदनशिल सरकारला याचे काही देणे घेणे नाही. आपण मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणासाठी लढणार असून आरक्षण मिळवून देणारच, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.