तळणी : मंठा तालुक्यातील देवठाणा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या काही समर्थकांनी भाजपचे राहुल लोणीकर यांना प्रचारा दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात जाब विचारला. ही घटना मंगळवार (ता. १२ ) रोजी तळणी सर्कल मधील देवठाणा - उस्वद गावात घडली..राहुल लोणीकर हे परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघ संघाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचे पुत्र आहेत. ते महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ देवठाणा - ऊस्वद गावात गेले होते. यावेळी राहुल लोणीकर हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांचे काही समर्थकांनी मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात प्रश्न विचारले..या प्रकाराची चित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बबनराव लोणीकर समर्थक कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणीकर समर्थक आणि मनोज जरांगे सर्थक यांच्यात शिवीगाळ झाल्याची एक चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे..Jalgaon Vidhan Sabha Election: 11 मतदारसंघात 54 उमेदवारांना सशस्त्र अंगरक्षक; लोकशाहीच्या उत्सवात निवडणूक लढविणारेच असुरक्षित.दरम्यान जरांगे पाटील समर्थकांकडून आमचे म्हणणे ऐकून घ्या, असे म्हणत असताना राहुल लोणीकर यांनी तुम्ही परभणीचे खासदार बंडु जाधव व बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना जाब विचारला का ? तसेच तुम्ही त्यांच्याकडून लिहुन घेतले का ? असा जाब विचारत स्टंटबाजी करू नका, असे राहुल लोणीकर म्हणाले.दरम्यान महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीत मराठा मत कांड्यावर मोजण्याइतके आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. #ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.