Manoj Jarange Patil : ...तर सरकारला किंमत मोजावी लागेल; मनोज जरांगे यांचा इशारा

सरकार जाणूनबुजून मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही तुम्हाला निवडून येऊ देणार नाही.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilesakal
Updated on

वडीगोद्री (ता. अंबड) - सरकार जाणूनबुजून मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही तुम्हाला निवडून येऊ देणार नाही. ओबीसीमध्ये इतर जातींचा समावेश करण्यात येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता लिहून घेतले का, आता ओबीसीला धक्का लागत नाही का, असे प्रश्न उपस्थित करणारे आता कुठे आहेत. मराठा कुणबी एकच असूनही आरक्षणाबाबत निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी शुक्रवारी (ता. ११) पुन्हा दिला.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शुक्रवारी (ता. ११) बोलताना जरांगे म्हणाले, ‘बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर शनिवारी (ता. १२) दसरा मेळावा असून मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या गडावरच्या मेळाव्यातून जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणूक आचारसंहिता लावू नका. तसे झाल्यास तुमचे उमेदवार निवडून येणार नाहीत.

जनतेचा रोष अंगावर घेऊन निवडणुका लढवू नका. तुम्ही ‘ए’, ‘बी’ किंवा कोणताही प्लॅन करा, तुम्ही यशस्वी होणार नाही. हरियानात झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. येथे आरक्षण दिले नाही तर तुमचा निवडणुकीत सुपडा साफ होणार आहे.’ राज्यात योजना व महामंडळांची खैरात केली जात आहे. पिकांची नुकसान भरपाई, पीकविमा आदींसह जनतेच्या अडचणींबाबत शासनाचे लक्ष नाही, असेही ते म्हणाले.

नारायणगडावरील दसरा मेळाव्यास सर्व जातीधर्माचे लोक येणार असून, पारंपरिक पद्धतीने तो होईल. विचारांची देवाणघेवाण होईल. सर्वांनी शांततेत मेळाव्याला यावे. मेळावास्थळी पार्किंग, महाप्रसाद, पाणी, दवाखाना, स्वच्छतागृहे आदींची व्यवस्था झाली आहे.

- मनोज जरांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.