वडीगोद्री (जि. जालना) - ‘एका जातीवर निवडून येणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्व बाजूंनी विचारविनिमय करून विधानसभा निवडणूक न लढण्याचे ठरविले. राजकारण हा आमचा खानदानी धंदा नाही. मराठा आरक्षण हेच उद्दिष्ट आहे. त्यावर ठाम आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहे. एक-दोन दिवसांत पुढील दिशा जाहीर करणार आहे,’ असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.