परळी वैजनाथ, (जि. बीड) - ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या राजकारणासाठी मराठ्यांना त्रास देऊ नका. मराठा आमदारांना माझ्या अंगावर घालत आहात. मराठे व शेतकऱ्यांचा त्रास तुम्हाला दिसत नाही’, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. मराठ्यांच्या विरोधात बोलणारे जन्माला येत आहेत. अशांचा हिशेब करणार आहे. अशा या आमदारांनी मराठ्यांच्या पोरांचा घात केला आहे. मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर सरकार पाडणारच, असा पुनरुच्चार त्यांनी केला.