Maratha Reservation : येत्या दोन दिवसांत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, त्याशिवाय मागे हटणार नाही,’; मनोज जरांगे पाटील

‘राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. त्याशिवाय मागे हटणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून आज दिला.
Manoj jarange Patil
Manoj jarange Patilsakal
Updated on

वडीगोद्री (ता. अंबड) - ‘राज्य सरकारने येत्या दोन दिवसांत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. त्याशिवाय मागे हटणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून आज दिला. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री जरांगे यांची प्रकृती खालावली होती. मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दीपक केसरकर यांनी फोनवर चर्चा केल्यावर व उपस्थित नागरिकांच्या विनंतीवरून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेत सलाईन लावून घेतले.

‘मंत्री व समाजबांधवांचा मान ठेवत सलाईन लावली होती. ती आता काढली आहे. सरकारने दोन दिवसांत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी. मी राजकीय भाषा सध्या बोलत नाही. मला व समाजाला राजकारणात यायचे नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे अन्यथा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल,’ असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. ‘समाजाने शांतता पाळावी. शांततेत आंदोलन करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘आंदोलनापुढे आंदोलन उभे करू नये. आम्ही ते करत नाही. पंढरपूर येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. आम्हाला विरोध करण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन त्यांना पाठिंबा द्यावा,’ असे जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता सांगितले.

काही काळ तणाव

शुक्रवारी (ता. २०) रात्री आणि शनिवारी वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी काही वाहनांना वडीगोद्री, रामगव्हान मार्गाचा वापर करण्यास सांगितले. यामध्ये आंदोलक समोरासमोर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूच्या आंदोलकांना शांत केले. सध्या येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ओबीसीं’कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यांनी एक समान न्याय द्यावा, जरांगे यांना ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी द्यावा, त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत.

- प्रा. लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.