नायगाव - राज्यात प्रचंड गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनचेचे राज्यातील महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये येत आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या तालुक्यातील १० हजार भाच्यांना आजपर्यंत गणवेश मिळाला नसल्याने जुन्याच गणवेशावर स्वतंत्र दिन साजरा करावा लागला. त्यामुळे भाच्यांना गणवेश कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.