Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा!

Manoj jarange Patil: दुचाकी, जेसीबी वाहनांसह बावी गावातील सकल मराठासमाजाचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा!
Maratha Reservation: sakal
Updated on

दीपक बारकूल

Yermala: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बावी (ता.वाशी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा गुरुवारी (ता.एक) काढण्यात आला.या मोर्चात शेकडो टॅक्टर सह,चार चाकी,दुचाकी जेसीबी वाहनांसह बावी गावातील सकल मराठासमाजाचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बावी ता वाशी येथील सकल मराठा समजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर,वाहन मोर्चा काढण्यात आला.मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण,व १९५१,१९६१ च्या जनगणनेची नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध करुन देण्यात यावे.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा!
Yermala News : येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला अभ्यासिका व्यायामशाळेसाठी पन्नास लाख रुपये निधी मंजुर

मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्ष भरापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण व आंदोलन करत आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष, आक्रोश आहे.तरी मराठा समाजास तात्काळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सकल मराठा समाजावतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या निवेदनात बावी ता. वाशी या गावचे १९५१ ची जनगणना, १९६१ ची जनगणना रेकॉर्ड तहसिल कार्यालयात उपलब्ध नाही. सदरील रेकॉर्ड चा शोध घेऊन ते उपलब्ध करून द्यावे.

तहसिल कार्यालयाच्या परिसरात असणारी महा-ई-सेवा केंद्रे आपले सरकारे केंद्राचे संचालक व तहसिल कार्यालयातील कर्मचारी संगणमताने विहित शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क अकारत असून मराठा समाजातील नागरीकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.तसेच केंद्रसंचालक अर्जदाराचे मोबाईल क्र.न. टाकता स्वतःचे मोबाईल क्रमांक टाकतात.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा!
Yermala Accident : अज्ञात ट्रकने मागून स्कुटीला धडक दिल्याने नर्सचा जागीच मृत्यू

त्यामुळे अर्जदारास अर्जाची सध्यस्थिती कळत नाही.तरी आपण तहसिल कार्यालयातील कमिशन पध्दत बंद करून सर्व प्रमाणपत्रे विहित दराने उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.

बावी येथुन सकाळी साडे नऊ वाजता निघालेल्या मोर्चातुन ट्रॅक्टर ६१,जे.सी.पी.३ मोटरसायकल ९० पिकअप १,चार चाकी ५,वाहणाचा ताफा घोषणा देत बारा वाजता वाशी तहसील कार्यालयावर धडकला वाशी शहरातून वाहनाच्या मोर्चेचा ताफा,घोषणानांच्या आवाजाने वाशी शहरातील मुख्य चौक दानानून गेल्याने मोर्चा पाहण्यासाठी वाशी ग्रामस्थांनी रस्त्यावर गर्दी केली होती. बावी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार राजेश लांडगे यांनी निवेदन स्विकारले.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा!
Dharashiv News : येरमाळा पोलिसांची दमदार कामगिरी ; अपघातातील अज्ञात ट्रक चालकाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.