Parli Vaijnath News : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशावर बहि‍णींनी सुरू केला स्वतःचा व्यवसाय

महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेत शासनाकडून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत.
artificial tree self business
artificial tree self businesssakal
Updated on

परळी वैजनाथ - महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेत शासनाकडून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन हप्ते खात्यात जमा करण्यात आले आहेत. या मिळालेल्या पैशावर अनेक महिला स्वतः साठी खरेदी करतात मात्र एका बहिणीने चक्क स्वतः चा व्यवसाय सुरू करुन १२ हजार रुपये कमाई केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सध्या मोठ्या फार्मात आहे. या योजनेची संपूर्ण राज्यात महिला वर्गात तसेच विरोधकांमध्ये चर्चा आहे. या योजनेचे दोन हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या मिळालेल्या पैशाचे काही महिलांनी स्वतः साठी खरेदी केली तर काही महिलांनी चक्क स्वतः चा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे.

शहरातील नेहरू चौक तळ भागात राहणाऱ्या अक्षरा अक्षय शिंदे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. या योजनेतून पहिला हप्ता ३००० रुपये अक्षरा शिंदे यांना प्राप्त झाले. हे पैसे इतरत्र ठिकाणी कुठेही खर्च न करता त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आर्टिफिशल वटवृक्ष झाडे तयार केले. त्यांनी कृत्रिम वटवृक्ष या उद्योगाला सुरुवात केली. अक्षरा यांच्या सासूदेखील या व्यवसायात त्यांना मदत करत आहेत. दीडशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत या झाडाची विक्री केली जाते आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा असाही फायदा... गौरी गणपती उत्सवात मोठी विक्री...

अक्षरा शिंदे यांनी सुरू केलेला लघू उद्योगातून तयार केलेल्या आर्टिफिशल वटवृक्षाची गौरी-गणपती उत्सवात विक्री केली. त्यातून त्यांना खर्च वजा जाता १२ हजार रुपये प्राप्त झाले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा व्यवसाय मोठा करण्याचा विचारात त्या आहेत.

सणासुदीच्या दिवसात या आर्टिफिशियल वटवृक्षाला परळी, अंबाजोगाई, सोनपेठ, परभणी या ठिकाणाहून मोठी मागणी होत आहे. त्यांच्या या व्यवसायाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे व्यवसाय वाढीचा प्रयत्न अक्षरा शिंदे या करत आहेत.

अक्षरा शिंदे यांनी महायुती सरकारचे मानले आभार....

अक्षरा शिंदे यांनी सांगितले की, मला खूप दिवसांपासून स्वतः चा व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण पैशांची अडचण असल्याने सुरू करु शकले नाही. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जे पैसे मिळाले त्या पैशावर मी स्वतःचा लघू उद्योग सुरू करु शकले,या उद्योगात मला माझ्या सासूबाई गिताबाई दिलीपराव शिंदे मोठी मदत करत आहेत. यामुळे घरात णी स्वाभीमानाने जगू शकत आहे. याचे संपूर्ण श्रेय महायुती सरकार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.