Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करा; सभापती अनुराधा चव्हाण यांनी मारला बँकेत ठिय्या

वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत अनेक दिवसांपासून केवायसी साठी महिलांनी सर्व कागदपत्रे दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने लाडकी बहीण योजनेपासून लाभार्थी वंचित राहत होते.
Anuradha Chavan
Anuradha Chavansakal
Updated on

फुलंब्री - राज्य शासनाने लाडकी बहिण योजना अमलात आणली असून या योजनेत सर्वसामान्य महिलांना लाभ मिळाला पाहिजे. मात्र बँकेतील तांत्रिक अडचणी असल्याने अनेक महिलेला लाडकी बहिण योजनेचा वेळेवर लाभ मिळत नाही. त्यामुळे बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जाऊन ठिय्या मांडून तांत्रिक अडचणी दूर करण्याची नुकतीच मागणी केली. त्यावेळी शाखा अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सभापती चव्हाण यांनी माघार घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.