अजबच! 'लाडका व्यापारी योजना सुरु करा', थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन; नेमकी मागणी काय?

Ladka Vyapari Yojana Eknath shinde : शासन समाजातिल सर्व घटकाकडे बारकाईने लक्ष देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
अजबच! 'लाडका व्यापारी योजना सुरु करा', थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन; नेमकी मागणी काय?
Eknath Shinde ladka vyapari yojana sakal
Updated on

Latest Marathwada News: मुख्यमंत्री लाडकी बहीन व लाडका भाऊ योजनेप्रमाणेच लाडका व्यापारी पेन्शन योजना सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन तसिलदार राजेश लांडगे यांच्यामार्फत मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना तालुका व्यापारी संघटणेच्या वतीने बुधवार (ता.२४) रोजी देण्यात आले आहे.मागण्याचे निवेदन अव्वल कारकुण जनार्धन तवले यांनी स्विकारले.(ladki bahin yojana)

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,शासनाने नुकतीच लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना जाहीर करुण समाजातील गोरगरीब,बहीणींना व बेरोजगार भावांना मदतीचा हात दिला आहे.यावरुन शासन समाजातिल सर्व घटकाकडे बारकाईने लक्ष देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.(ladka bhau yojana)

अजबच! 'लाडका व्यापारी योजना सुरु करा', थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन; नेमकी मागणी काय?
CM Eknath Shinde: शिवसैनिकांनीच रोखला थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा, नेमकं काय घडलं?

प्रत्येक व्यापारीही समाजाचा एक महत्वाचा घटक असुन शासनाचा आर्थिक कणा आहे.शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनेसाठीचा सर्व पैसा व्यापाऱ्यांमार्फतच जी.एस.टी., इन्कम टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, वेट अँन्ड मेजरमेंट टॅक्स, फुड लायसन्स फीस, शॉप अँक्ट फीस अशा विविध कराच्या माध्यमातुन शासनाच्या तिजोरीत जमा होत असल्याने योजनेसाठी निधी उपलब्ध होत आहे.(dharashiv)

माञ व्यापाऱ्याच्या कल्याणासाठी शासनाने आजपर्यंत एकही योजना जाहीर केलेली नाही.व्यापारात नुकसान झाल्यास किंवा एखाद्या व्यापाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास त्यांचे संपुर्ण कुटुंब रस्त्यावर येते.माञ अडचणीतील व्यापा-यांच्या कुटुंबाला शासनाकडुन कोणती मदत मिळत नाही.शासन आमच्या नफ्यामध्ये भागीदार असेल तर नुकसानीलाही त्यांनी जबाबदार 'राहाणे आवश्यक आहे. कोरोना नंतरच्या काळामध्ये अनेक व्यापारी देशोधडीला लागले.

अजबच! 'लाडका व्यापारी योजना सुरु करा', थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन; नेमकी मागणी काय?
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सुवर्ण पिंपळ’ बीज प्रसादाचे वाटप;माउली हरित अभियानांतर्गत वाखरी विसावा येथे वृक्षारोपण

दुकाने बंद ठेवुनही बँकेचे व्याज भरत राहीले.तर दुसरीकडे ऑनलाईन मार्केटींग व मॉल सिस्टीममुळे सर्वसामान्य व्यापाऱ्याचा व्यावसाय मोडकळीस आला असुन व्यावसायाचा दैनंदीन खर्चाचा ताळेबंदही जुळवणे शक्य होत नाही.समाजातील प्रत्येक घटक हा ठराविक वयोमानानुसार आपल्या कामातुन निवृत्ती स्विकारतो. पण व्यापाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांना आपली दैनंदिन उपजिवीका भागविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसते. किंवा कोणत्याही प्रकारची मदत शासनाच्या कोणत्याही योजनेतुन होत नसल्याने लाडका व्यापारी पेन्शन योजना सुरु करावी.

निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे,सचिव अँड.प्रविण पवार,नितिन टेकाळे,संजय जोशी,सुर्यकांत मोळवणे,अमोल कवडे,राजेंद्र होळकर,शिवाजी लोंढे यांच्यासह अनेक व्यापा-यांच्या सह्या आहेत.

अजबच! 'लाडका व्यापारी योजना सुरु करा', थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन; नेमकी मागणी काय?
Eknath Shinde : वाघनखे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक;मुख्यमंत्री,छत्रपतींच्या पराक्रमाचा अपमान सहन करणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.