पाचोड - कारचालकाला डूलकी लागल्याने कारच्या वेगावरील नियंत्रण सुटून बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणारी कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने कोलांट्या उडया घेत दहा फूट रस्त्याखाली नालीत जाऊन उलटल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भोकरवाडी शिवारात एचपी पेट्रोलजवळ मंगळवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली असून यांत शोयब शेख (वय ३० वर्षे) व आमेर शेख (वय २३ वर्षे) दोघेही रा. सेंट्रल नाका, छत्रपती संभाजीनगर असे जखमींचे नावे आहेत.