फुलंब्री - राज्यभरातील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देऊन फुलंब्री विधानसभेसाठी असणाऱ्या इच्छुकांनीही थेट अंतरवली सराटी गाठून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.
राज्यभरातून आलेल्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याने २० ऑक्टोबर रोजी 'लढायचे की पाडायचे' यावर मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज बांधवांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या इच्छुकांना आज खाली हात परतावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे.