Ajay Baraskar: मी फडणवीसांचा माणूस, म्हणून...; अजय बारस्कर सागर बंगल्यासमोर बसले ठाण मांडून

Ajay Baraskar at Devendra Fadnavis Sagar Bunglow: पोलिसांनी त्यांना येथून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
Ajay Baraskar
Ajay Baraskar
Updated on

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर अजय बारस्कर ठाण मांडून बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. पोलिसांनी त्यांना येथून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण व्हावे यासाठी मी इथे बसलो आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात मी देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे. त्यांनी माझ्यावर शिक्का मारला आहे. आता मी त्यांच्या बंगल्यासमोर येऊन बसलो आहे. तुमच्यात हिंमत नसेल पण माझ्यात हिंमत आहे. तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील गोळ्या घाला. मला इथे बसायचा अधिकार आहे, असं अजय बारस्कर म्हणाले आहेत.

Ajay Baraskar
Manoj Jarane; लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारने मराठ्यांविरोधात टाकलेला डाव, मनोज जरांगेंचा गंभीर दावा

आरक्षण हे सरकारचं देऊ शकतं. त्यामुळे मी याठिकाणी बसलो आहे. विनाकारण माझ्यावर शिक्का मारला आहे. मी फडणवीसांचा माणूस आहे, म्हणून खोटं पसरवलं जातं आहे. माझा शरद पवारांसोबतचा देखील फोटो आहे. यांच्या सोयीचे जे आहे हे दाखवतात. माणसाला बदनामा केलं जातंय. माझ्यावर बलात्काराचा आरोप झाला. यांना विरोध केला की हे माणसाला संपवतात. हे लोक हुकूमशाह झालेत, अशी टीका बारस्करांनी केली.

Ajay Baraskar
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा विधानसभेसाठी नेमका प्लॅन काय? इच्छुक उमेदवारांना अंतरवालीला बोलावले

कोर्टाची लढाई कोर्टात आहे तर मनोज जरांगे का उपोषणाला बसले आहेत? उपोषणाने प्रश्न सुटतात का? कितीवेळा उपोषणाला बसले. आतापर्यंत काय झालं? राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे. याला जबाबदार मनोज जरांगे आहेत. ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येणार होते. ते आले नाहीत मी आधी आलो. माझ्यात हिंमत होती म्हणून मी आलो, असं बारस्कर म्हणाले.

माझी गाडी पंढरपुरात जाळली. मला शेकडो फोन येतात, शिव्या दिल्या जातात. ही लोकशाही आहे का? मला दुसरा कोण शत्रू आहे. फडणवीसांच्या हातात जे आहे त्यांनी ते करावे. सर्व मराठ्यांना मदत करा. माझा जीव गेला तरी चालेल. माझ्या घरावर हल्ला झाला. हे मी प्रसिद्धीसाठी करत नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.