दिवा - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा चांगला प्रतिसाद आता विरोधी पक्षांतील बऱ्याच नेत्यांना पोटदुखी होताना दिसत आहे. तर मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना काँग्रेस नेते सुनील केदारे यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यावर बंद करु असे विधान केलेले आहे.
या विधानाचा शिवसेनेकडून राज्यभर निषेध होत आहे. गुरुवार 19 तारखेला डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने काँग्रेसचे सुनील केदारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.