Maharashtra Assembly Election: भाजपचा राज्यातही ‘हरियाना पॅटर्न’! मराठेतरांच्या मेळाव्यांचा आधार

Vidhansabha Election: काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने मविआच्या जागावाटपात ठाकरे गट जास्त जागा मागेल, असे संकेत आहेत.
Maharashtra Assembly Election BJP
Maharashtra Assembly Election BJPesakal
Updated on

BJP's Haryana Election Patern In Maharashtra Election: हरियानातील अत्यंत कठीण विधानसभा निवडणूक जिंकताना भाजपने जागांची नाराजी लक्षात घेत अन्य जातींना एकत्र आणून ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठेतर समाजांचे मेळावे घेत भाजप मतांची बेगमी करत आहे. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आजवर १६८ छोट्या-मोठ्या जातींचे मेळावे घेतले आहेत.

मराठा समाजाला समवेत आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच या मराठेतर जातींना भाजपने जोडून घेतले आहे. महायुतीला हरियानाने दिलासा दिला असतानाच काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने मविआच्या जागावाटपात ठाकरे गट जास्त जागा मागेल, असे संकेत आहेत.

Maharashtra Assembly Election BJP
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

हरियानाच्या निकषावर आणि तशाच समीकरणांचा आधार घेत महाराष्ट्रातील निवडणूक जिंकण्याचे नियोजन भाजपने केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू सहकारी विजय चौधरी हे या मेळाव्यांचे आयोजन करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हरियानाप्रमाणे मोहीम राबवली जात असून तेथे मिळालेले यश हे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असा विश्वास भाजपत व्यक्त होत आहे. मोठा समाज भाजपच्या विरोधात गेल्यानंतर अन्य समाजांची मोट बांधून मतांना एकत्र आणण्याचे केलेले प्रयत्न हा हरियानातील भाजपच्या विजयाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

महाराष्ट्रात अत्यंत प्रबळ मराठा समाज भाजपवर नाराज आहे. भाजपने ‘प्लॅन बी’ म्हणून ओबीसी समाजाचे छोटे मिळावे सातत्याने आयोजित करणे सुरू ठेवले आहे. या आधारावरच नवे सामाजिक समीकरण प्रत्यक्षात येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. भूपेंद्र यादव यांनी गेले काही दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात मांडव घालून छोट्या जातींशी संवाद साधण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे. हरियानात भाजपला मदत करण्यासाठी संघ परिवाराने पडद्यामागून नेहमीपेक्षा अधिकच सक्रियरीत्या मदत केली, असे बोलले जाते.

या वेळी महाराष्ट्रातील संघ परिवाराचे कार्यकर्ते अत्यंत हिरिरीने प्रचारात उतरतील, असे समजते. महाराष्ट्रात त्याचा फायदा होईल. हरियाना सरकारने ५० दिवसांत घेतलेले १२६ निर्णय हे निकाल बदलणारे ठरले, असे मानले जाते. महाराष्ट्रातही भाजपने निर्णयांचा धडाका लावला आहे. या आधारावरच आगामी निवडणूक जिंकता येईल, असा सूर आज भाजपच्या कार्यालयात व्यक्त करण्यात येत होता.

Maharashtra Assembly Election BJP
Maharashtra Assembly Elections 2024: आला छत्रपतींचा नवा पक्ष! राज्यात युती-आघाड्यांचे टेन्शन वाढले, चिन्ह देखील ठरले

काँग्रेसला माघार घ्यावी लागणार!

हरियानात अपेक्षित यश मिळाले नसल्याने काँग्रेसच्या छावणीत नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे अपयश ही ठाकरे गटाला मिळालेली संधी मानली जाते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, ही जुनी मागणी पुढे आणली. ते काही जागांचा आग्रह धरतील आणि हा आकडा १२० पेक्षा कमी नसेल, असेही एका सूत्राने सांगितले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील १४८ जागांचा स्वतः आढावा घेतला असून कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, हे त्यांचे सूत्र आहे. शरद पवार गटालाही अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

‘हरियानात जे घडले तेच महाराष्ट्रात घडणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत हरियानातील जनतेने खोटा प्रचार करणाऱ्यांना नाकारले आहे. आता लवकरच महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. हरियानात जसा निकाल लागला, तसाच निकाल महाराष्ट्रातही लागणार आहे, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. हरियानात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविल्याबद्दल येथील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. दरम्यान, हरियाना आणि महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे भिन्न असून आजच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही, असा दावा महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Election BJP
Maharashtra Assembly Elections: मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 96,96,96... मुख्यमंत्री कुणाचा होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.