Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. कालपासून त्यांची प्रकृती देखील खालवत चालली आहे. परंतू सरकारनं यावेळी त्यांच्याकडं दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत 'सकल मराठा समाज' या संघटनेचे कार्यकर्ते मुंबईत आंदोलनासाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याला ते घेराव घालणार आहेत.

CM Eknath Shinde
दिल्लीच्या पहिल्या सर्वात तरुण CM आतिशी यांचं वय, शिक्षण अन् संपत्ती किती?

पुण्यातून हे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. मनोज जरंगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असताना सरकार त्यांच्याकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसंच मंत्रालयाला देखील घेराव घालणार असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख मराठा आंदोलकांशी चर्चा करत आहेत.

CM Eknath Shinde
Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

आज जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली नाहीतर उद्या दुपारी बारा वाजण्यापर्यंत १ लाख मराठा तरुण मुंबईत घुसतील, असा इशारा एका कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची सूचना केली. पण आम्ही आझाद मैदानात आंदोलनासाठी आलेलो नाहीत, तर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत, असं आणखी एका कार्यकर्यानं साम टीव्हीशी बोलाताना सांगितलं.

CM Eknath Shinde
Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हे कार्यकर्ते जमले असून ते 'एक मराठा, लाख मराठा', 'मनोज जरांगे पाटील हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलकांनी महापालिकेजवळचा रस्ता अडवल्याचीही माहिती मिळते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.