Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी थोडासा संयम बाळगावा; शंभूराज देसाईंचा सल्ला
sambhjraj desai

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी थोडासा संयम बाळगावा; शंभूराज देसाईंचा सल्ला

Sambhuraj Desai: हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह त्यां‍चा आहे. त्यासाठी ११ अधिकाऱ्यांची टीम तेलंगणा सरकारकडे गेल्या होत्या,
Published on


Latest Thane NEws : सगे सोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलेला आहे. आठ लाखांपेक्षा जास्त ऑब्जेक्शन हरकती आलेल्या आहेत. त्यानंतरही कालच्या बैठकीत याबाबतीत कायदेशीर सल्ला घेण्यात आला.

सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे, असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांना थोडासा संयम बाळगावा, असा सल्ला दिला.

ठाणे जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री शंभूराजे देसाई हे ठाण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा सल्ला दिला. जरांगे पाटील यांना भेटलो, तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ मागितली होती.

परंतु त्यांनी एकाच महिन्याचा कालावधी दिला. ते सातत्याने म्हणत आहेत, मुख्यमंत्र्यांवर त्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीच आदेश दिलेले आहेत की, एकही दिवस वाया न घालवता याबाबतीत काम चालू ठेवा. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस वाया घालवलेला नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

जरांगे यांनी भेटीदरम्यान महत्त्वाच्या दोन-तीन गोष्टी मांडल्या होत्या. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह त्यां‍चा आहे. त्यासाठी ११ अधिकाऱ्यांची टीम तेलंगणा सरकारकडे गेल्या होत्या, त्या परत आल्या आहेत. मात्र, त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही.

सोमवारी त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याबाबतीत आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.