पर्यटनानंतर दाजीपूर आता मधाचे गाव होण्याच्या मार्गावर; आमदार आबिटकरांचा उपक्रमासाठी पाठपुरावा सुरू

Radhanagari Tourism : तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने मध उत्पादन व संकलन करतात.
Radhanagari Tourism
Radhanagari Tourism esakal
Updated on
Summary

ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाद्वारे दाजीपुरात मधांचे गाव उपक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे.

राधानगरी : राज्याच्या पर्यटन (Radhanagari Tourism) नकाशावर ठळक स्थान मिळवलेले दाजीपूर (Dajipur) आता आगामी काळात मधाचे गाव होण्याच्या मार्गावर आहे. पाटगावच्या धर्तीवर दाजीपूरही मध उत्पादकांचे केंद्र विकसित करण्याची मागणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाद्वारे केली होती. त्यानुसार खादी ग्रामोद्योगकडून स्थानिकांशी चर्चा करून योजना तयार करण्यात येत आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने मध उत्पादन व संकलन करतात. मधुमक्षिका पालन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन बनले आहे. उपलब्ध माहितीनुसार आजमितीस जवळपास ३०० कुटुंबे या व्यवसायात आहेत. उत्पादित होणारा मध एकत्रित संकलित करून त्याची प्रतवारी आणि पॅकिंग यातून मधुमक्षिका पालन व्यवसाय विस्तारास पश्चिम भागात मोठा वाव आहे.

Radhanagari Tourism
रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पण या 4 लोकांनी असे करणे टाळावे!

खादी ग्रामोद्योग विभागाकडून मध व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान व मधपेट्या मिळतील. मधुमक्षिका पालनासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास या व्यवसायाकडे वळणाऱ्या तरुण बेरोजगारांची संख्या वाढून मधुमक्षिका पालन व्यवसायाला पाठबळ मिळेल. मध उत्पादनात वाढ होईल.

मध व त्यापासून तयार होणारी उत्पादने ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगाराची संधी मिळवून देणारी आहेत. मधमाशी पालनाने आणि शेती उत्पादनात वाढ, उत्तम दर्जाचा मध उत्पादन, मध संकलनातील सेवांच्या दर्जात वाढ, मधमाश्या दवाखाना, प्रयोगशाळा उभारणी, मध प्रक्रिया आदी मधाचे गाव म्हणून एकाच गावात पार पडतील. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरज आहे.

Radhanagari Tourism
गुलाबी पेरू आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही; डॉक्टरही का देतात फळं खाण्याचा सल्ला?

ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाद्वारे दाजीपुरात मधांचे गाव उपक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे. या ठरावाला खादी ग्रामोद्योग विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. आगामी काळात दाजीपूर मध उत्पादकांचे केंद्र म्हणून विकसित होईल. या दृष्टीने खादी ग्रामोद्योग विभागाने आश्वासक पाऊल उचलले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांचाही उपक्रमासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-अनिता देशमुख, तहसीलदार, राधानगरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.