Shardiya Navratri : अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण; मंदिर परिसरात कडक सुरक्षायंत्रणा

Shardiya Navratri 2024 : यंदा नवरात्रोत्सवाच्या चार दिवस आधीच दुर्गाज्योत नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळे मंदिरात दाखल झाले आहेत.
Ambabai Temple
Ambabai Templeesakal
Updated on
Summary

साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Temple) नित्य व उत्सव काळातील सोन्याच्या जडावी दागिन्यांची स्वच्छता रविवारी करण्यात आली. देवीसाठी बनवलेली सोन्याची पालखीही स्वच्छतेनंतर झळाळली. रविवारी दिवसभर देवस्थान कार्यालयाच्या शेजारील मंडपात दागिन्यांची स्वच्छता सुरू राहिल्याने सुरक्षायंत्रणा कडक केली होती.

Ambabai Temple
खासदार महाडिकांच्या सुपुत्राची राजकारणात होणार एन्ट्री? कृष्णराज म्हणाले, 'पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार'

साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रूपांत जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी महत्त्वाचे पारंपरिक दागिने (Gold Ornaments) देवीला परिधान केले जातात. यामध्ये जडावाचा किरीट, कुंडले, पान, चिंचपेटी, सात पदरी कंठी, कोल्हापुरी साज, श्रीयंत्र, सोन्याची पालखी, चौऱ्या, मोर्चल, चोपदार दंड, मोहन माळ, मंगळसूत्र, कवड्याची माळ यासह इतर आभूषणांचा समावेश आहे. या सर्व सोने दागिन्यांची मंदिरातील परंपरागत कारागिरांनी स्वच्छता केली. सहा ते सात तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती.

संकेत पोवार, गजानन कवठेकर, अनंत कवठेकर, उमेश लाड, उदय लाड, शैलेश इंगवले, रमेश पोतदार, आकाश लाड, दिनेश सावंत, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या नियंत्रणाखाली सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण झाली. सहा ते सात तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती.

Ambabai Temple
हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या बैलजोडीने जिंकली 22 लाखांची 'थार' गाडी; कोल्हापूरचा हरण्या ठरला ट्रॅक्टरचा मानकरी

दुर्गाज्योत नेण्याची लगबग

यंदा नवरात्रोत्सवाच्या चार दिवस आधीच दुर्गाज्योत नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळे मंदिरात दाखल झाले आहेत. ज्योत लावल्यानंतर ‘अंबा माता की जय’ या गजरात मंदिर परिसर दुमदुमन जात आहे. रविवारी बीड येथील खळेगाव येथून तरुण दुर्गा ज्योत नेण्यासाठी मंदिरात आले होते.

सोन्याची पालखी झळाळली

नवरात्रकाळात दररोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी मिरवणूक काढण्यात येते. ललिता पंचमीदिवशी अंबाबाई त्र्यंबोली भेटीसाठी टेंबलाई टेकडीवरील मंदिरात पालखीतून जाते. अष्टमीदिवशी देवीची पालखी नगरप्रदक्षिणा काढण्यात येते. शाही दसऱ्यासाठीही ही पालखी दसरा चौकात जाते. यासाठी अंबाबाईसाठी सोन्याची पालखी घडवली आहे. पालखीची स्वच्छता व पॉलिश करण्याचे काम रविवारी करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.