Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojnaesakal

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजनेबद्दल कोल्हापुरात पसरली ही अफवा, बँकेत उडाली महिलांची झुंबड

Kolhapur: जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, जमा झालेली रक्कम सरकार परत घेणार म्हणून अफवा पसरवली आहे.
Published on

कोल्हापूर, ता. २० : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बँकांमध्ये महिलांच्या खात्यावर जमा झालेले तीन हजार रुपये सरकार परत घेणार असल्याची अफवा पसरवल्याने मलकापूर, बांबवडे परिसरात महिलांनी खासगी व सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली. तर, ज्या महिलांनी अर्ज भरला आहे आणि त्यांचेही पैसे जमा झालेले नाहीत, अशा महिलांनी बँकेचे केवायसी पूर्ण करण्यासाठी गर्दी केल्यामुळे बँकांमध्ये गोंधळ उडाला.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींनाच कळेना कोणत्या खात्यात आले पैसे ; पैसे, खाते तपासण्यासाठी बँकांमध्ये गर्दी

जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, जमा झालेली रक्कम सरकार परत घेणार म्हणून अफवा पसरवली आहे. त्यामुळे बँकांमध्ये शासनाकडून जमा झालेली रक्कम मिळविण्यासाठी गर्दी वाढली आहे. ही रक्कम परत जाणार नाही, असे बँकेकडून वारंवार सांगितले जात असतानाही महिला काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ज्यांचे नवीन केवायसी किंवा कागदपत्रांची पूर्तता करायची आहे अशा महिलांची गैरसोय होत आहे. ज्या महिलांना ही रकक्म दिली आहे ती परत घेतली जाणार नाही. तरीही अफवेला बळी पडून शेकडो महिला आपआपल्या बँक कार्यालयांत सकाळपासूनच गर्दी करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...