जोतिबा डोंगर - येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाची तीन पाकळी सोहन कमळपुष्पातील राजेशाही थाटातील खडी महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा गावातील दहा गावकर व नितीन लादे प्रविण कापरे शुभम भंडारी प्रकाश सांगळे आदीनाथ लादे सूरज उपाध्ये यांनी बांधली.
दख्खनचा राजा जोतिबा देवाचा नवरात्र उत्सव हा इतर देवतांच्या पेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याला अध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. या ठिकाणी नवरात्रोत्सवात वेगवेगळ्या रूपातील कमळ पाकळ्यातील महापूजा बांधल्या जातात. त्या प्रत्येक पाकळीस मोठे महत्त्व आहे. या पाच पाकळ्या पैकी तीन पाकळ्या श्री जोतिबा देवाचा त्रिदेवात्मक अवतार दर्शवितात तर खालील दोन पाकळ्या कमळ पुष्पाचे द्विदल आहे. हे मनातील सगुण आणि निर्गुण भावाचे प्रतीक आहे .
श्री जोतिबा देवांच्या राज्याभिषेकानंतर अष्टभैरव व देवाचा सरसेनापती काळभैरव , करवीर निवासिनी महालक्ष्मी यमाईदेवी,चोपडादेवी व सर्व सैन्यासह लवाजमा नवरात्र उत्सव काळात मंदीरात होता. त्यावेळी कमळभैरव जोतिबा देवांना नवरात्र सोहळ्यात पुजेसाठी काशीहून सुवर्णकमळे आणून देत अशी आख्यायिका आहे. त्याच्या आधारे कपड्यांच्या रंगीत पाकळ्या करून या महापूजा बांधल्या जातात.येथील पुजारी मंडळी या महापूजा सुंदर पध्दतीने बांधतात. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असतात.
आज धुपारती सोहळ्याला पुजारी ग्रामस्थ देवसेवक, पश्चिम महाराष्ट्र समितीचे पश्चिम महाराष्ट्र समितीचे अधिक्षक धैर्यशील तिवले व कर्मचारी भाविक उंट घोडा या मानाच्या प्राणी व लावाजमासह मिरवणुकीने गेले.
दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा मुख्य मंदिरात आला. त्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. मंदिरात रात्री नऊ ते बारा या वेळेत जोतिबावरील भजनी मंडळांचा कार्यक्रम झाला.रात्री एक वाजता मंदिर बंद करण्यात आले.
दरम्यान, कालपासून जोतिबा मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सर्व परिसर उजळून निघाला आहे. कालपासून राज्यभरातील तसेच कर्नाटक राज्यातून भाविक येण्यास प्रारंभ झाला. मंदिर परिसरात कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.