Navratrotsav 2024 : जोतिबा मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ... सनई तुतारीच्या गजरात घटस्थापनेचा विधी.. नागवेलीच्या पानातील राजेशाही महापूजा..

जोतिबा डोंगर येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात आज शारदीय नवरात्र उत्सवास पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला.
Jyotiba Dongar Navratrotsav
Jyotiba Dongar Navratrotsavsakal
Updated on

जोतिबा डोंगर - येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात आज शारदीय नवरात्र उत्सवास पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. तुतारी ढोल सिंग सनई या वाद्यांच्या गजरात मुख्य मंदिरात सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत घटस्थापनेचा विधी झाला. आज पहाटे चार वाजल्यापासून मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

जोतिबा देवासह सर्व देव देवतांना महाभिषेक घालण्यात आला. या वेळी केदार स्त्रोत्र केदार महिमा यांचे पठण झाले. दख्खनच्या राजा श्री जोतिबा देवाची आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानातील राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा गावातील दहा गावकर व अंकूश दादर्णे दगडू भंडारी नितिन लादे सरदार सांगळे सूरज उपाध्ये आदीनाथ लादे यांनी बांधली.

जोतिबा मंदिरातील घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता मूळ माया श्री यमाईदेवी तूकाईदेवी भावकाई देवी या मंदिरात घटस्थापना करण्यासाठी धुपारतीसह पुजारी ग्रामस्थ देवसेवक, पश्चिम महाराष्ट्र समितीचे पश्चिम महाराष्ट्र समितीचे अधिक्षक धैर्यशील तिवले व कर्मचारी भाविक उंट घोडा या मानाच्या प्राणी व लावाजमासह मिरवणुकीने गेले.

श्री यमाई मंदीरात घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर कर्पूरेश्वर तलावा जवळील तुकाई मंदिरात घटस्थापनेचा विधी झाला. भावकाई या मंदिरात ही घटस्थापना झाली.

दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा मुख्य मंदिरात आला. त्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. त्यामुळे परिसरात धुपारतीची सांगता व घटस्थापना झाल्याचे समजले. मंदिरात रात्री नऊ ते बारा या वेळेत जोतिबावरील भजनी मंडळांचा कार्यक्रम झाला.रात्री एक वाजता मंदिर बंद करण्यात आले दरम्यानजोतिबा देवाचा जागर सोहळा येत्या गुरुवारी ( ता. १० ) होणार आहे. तर पहिला पालखी सोहळा १२ तारखेला सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.

दरम्यान, कालपासून जोतिबा मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सर्व परिसर उजळून निघाला आहे. ही रोषणाई विजयादशमी पर्यंत ठेवली जाणार आहे . दरम्यान, आजपासून राज्यातून भाविक येण्यास प्रारंभ झाला. मंदिर परिसरात कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.