भारताचा ऑस्कर विजेता गायक ए आर रहमान याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या सुरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा चाहत्यांचा आवडता गायक ए आर रहमान त्याच्या पत्नीपासून विभक्त होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी गायकाची पत्नी सायरा बानू हिने एक निवेदन जाहीर करत याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. एआर रहमान आणि त्याची पत्नीने लग्नाच्या 29 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत. ए आर रहमानच्या मुलानेही त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करत भाष्य केलं आहे.