तारीख ठरली! आई- बाबा 'या' दिवशी येणार भेटीला; तर स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप

Aai Ani Baba Retire Hot Aahet Release Date: स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची तारीख आता नव्या प्रोमोसोबतच जाहीर करण्यात आली आहे.
aai ani baba retire hot ahet
aai ani baba retire hot ahet esakal
Updated on

टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्या शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. त्यात स्टार प्रवाह वाहिनी गेले कित्येक वर्ष १ नंबरवर ठाण मांडून आहे. गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिकांची घोषणा होताना दिसतेय. तर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आठवड्याभरापूर्वीच स्टार प्रवाहवर आईचा महिमा सांगणारी 'उदे गं अंबे' ही एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही मालिका ६. ३० वाजता सर्वाधिक टीआरपी मिळवणारी पहिली मालिका ठरली. आता स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती म्हणजे 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो समोर आला होता. आता या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली आहे.

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांसोबत कोणते कलाकार आहेत हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. मात्र आता वाहिनीने या मालिकेचा मोठासा प्रोमो प्रदर्शित करत मालिकेची तारीख आणि वेळ सांगितली आहे. ही मालिका संध्याकाळी नाही तर दुपारच्या सत्रात दाखवली जाणार आहे. द'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका २ डिसेंबर पासून दुपारी २. ३० वाजता सुरू होणार आहे. आता या मालिकेच्या जागी 'आई कुठे काय करते' ही मालिका दुपारी प्रक्षेपित केली जाते. मात्र २ डिसेंबरपूर्वी कित्येक वर्ष सुरू असलेली 'आई कुठे काय करते' मालिका निरोप घेणार आहे.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रेक्षकांना आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतात आणि त्यानंतर एक दिवस येतो रिटायरमेंटचा…आता रिटायरमेंटनंतर दोघांची इच्छा असते गावी जाऊन राहण्याची, ही इच्छा पूर्ण होईल का? मुलांच्या व कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन हे जोडपं सुखी रिटायरमेंट आयुष्य जगू शकेल का? असं कथानक पाहायला मिळेल.

aai ani baba retire hot ahet
पहिल्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली अभिनेत्री नीलम कोठारी ; "नावात बदल, नॉनव्हेज बंद आणि..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.