दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय मराठी अभिनेत्री; ८ महिन्याची गरोदर असतानाही करत होती काम, आता मालिकेतून एक्झिट

Marathi Actress Second Pregnancy: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकतीच गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री आता तिच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
marathi actress pregnancy
marathi actress pregnancy esakal
Updated on

मराठी मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या आहेत. मालिकांमध्ये दिसणारे कलाकारही प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. हे कलाकार प्रेक्षकांच्या घरातलेच एक सदस्य होतात. कलाकारही चाहत्यांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ही अभिनेत्री लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने आता मालिकेतूनही एक्झिट घेतली आहे. ही अभिनेत्री आहे प्रेक्षकांची लाडकी खुशबू तावडे. खुशबूने 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा निरोप घेतला आहे.

खुशबू गरोदर असून ती लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अभिनेत्रीने नुकतीच ही गुडन्यूज दिली आहे. तिने चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली नसली तरी तिने 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. नुकतेच तिने तिचे मालिकेतील शेवटचे काही भाग शूट केले आहेत. खुशबू ही आठ महिन्याची गरोदर असतानाही काम करत होती. अखेर तिने मालिकेचा निरोप घेतला आहे. आता तिची जागा एक दुसरी अभिनेत्री घेणार आहे.

खुशबू आणि संग्राम साळवी यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांनी २०१८ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २०२१ मध्ये खुशबूने एका मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचं नाव राघव असून आता खुशबू तिच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. यासंदर्भात राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ''मी आई होते आहे आणि हे आईपण निभावण्यासाठी मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो आहे. या मालिकेला वर्ष झाले असून, ८ महिने गरोदरपणात मी मालिकेच्या सेटवर काम केलं.' आता खुशबूच्या जागी दुसरी लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहे.

marathi actress pregnancy
Phir Aayi Hasseen Dillruba: पुन्हा चालली तापसीची जादू? नेटकऱ्यांनीच दिला निर्णय,चित्रपट पाहण्याआधी वाचा ट्वीटर रिव्ह्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.