मुंबईकर झाली मधुराणी प्रभुलकर! घेतलं हक्काचं घर; व्हिडिओ शेअर करत म्हणते- इतकी वर्ष जे स्वप्न...

Madhurani Prabhulkar Buy New House In MUmbai: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
madhurani prabhulkar new house
madhurani prabhulkar new houseesakal
Updated on

'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मधुराणी अरुंधती बनून अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मधुराणी कायमच प्रेक्षकांशी जोडलेली राहते. ती सोशल मिडियावरही सक्रीय असते. ती कायम तिच्या आयुष्यातील खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच मधुराणीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने मुंबईत तिचं हक्काचं घर घेतलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. या व्हिडीओत तिने घराची झलक दाखवली आहे. तर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मधुराणीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती तिच्या मुलीला त्यांचं नवं घर पाहायला घेऊन आली आहे. तिने मुंबईतील विलेपार्ले येथे घर घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचं घर दिसतंय. ती मुलीला त्यांचं घर दाखवतेय. छानसा हॉल, ऐसपैस किचन या व्हिडिओमध्ये दिसतंय. तर यासोबतच खेळण्यासाठीही मैदान या व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, 'मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न... ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे.'

तिने पुढे लिहिलं, 'आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय. सविनय व सादर आभार.' तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. चाहते तिच्यासाठी खूप आनंदी आहेत.

madhurani prabhulkar new house
नाटक करताना अचानक तब्येत खालावली... अभिनेता अतुल तोडणकरला ब्रेन हॅमरेज, पोस्ट करत सांगितलं काय घडलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.