बॉलिवूड अभिनेता आमिर खान जितका त्याच्या अभिनयासाठी चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिरने त्याच्या चित्रपटातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत विषय ठरलं. आमिरने दोन लग्न केली. त्याला तीन मुलंही आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. आमिरने त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर अखेर पडदा टाकला आहे.
आमिरचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. रीना आणि आमिरचं लग्न 1986 मध्ये झालं होतं. हे लग्न 16 वर्षे टिकलं. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रीनानंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. किरण आणि आमिरने २०२१ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली होती. आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. जिथे अभिनेत्रीने त्याला पुन्हा लग्न करण्याबद्दल विचारलं.
जेव्हा रियाने आमिरला तिसऱ्यांदा लग्न करण्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, 'मी आता 59 वर्षांचा आहे. मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेन. अवघड आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. जी माझ्या कुटुंबाशी पुन्हा जोडलेली आहेत. मला मुलं, भाऊ आणि बहिणी आहेत. माझ्या जवळच्या लोकांमध्ये मी आनंदी आहे. मी एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी काम करतोय.' आमिरने या पॉडकास्टमध्ये त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.