Entertainment News: मराठी अभिनेता आशय कुलकर्णी याने मालिका आणि चित्रपटात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. आशयच्या ' सुख कळले' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आशय हा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा चांगला मित्र आहे. मात्र आपल्या चांगल्या मित्राने जर आपल्याला हनिमूनला सतत फोन करून त्रास दिला तर? असाच त्रास आशयने विराजसला दिला होता. आणि शेवटी कंटाळून शिवानीने आशयला मेसेज केला होता. तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे आशयने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
आशय आणि विराजस यांनी नुकतीच लोकमत फिल्मीच्या आपली यारी या सेगमेंटला भेट दिली. यात बोलताना तो म्हणाला, 'व्हिक्टोरियाचं डब करत असताना पहिलं डबिंग झालं होतं. पण परत काहीतरी बदल करायचे होते. विराजसच्या लग्नाच्या वेळेस 'व्हिक्टोरिया' चित्रपटाची प्रोसेस सुरू झालेली. त्यामुळे त्याला लग्नानंतर शिवानीसोबत कुठे जाता आलं नव्हतं. हनिमून सगळं सोडून त्यांनी लग्नानंतर एक दिवस सुट्टी घेतलेली आणि पुन्हा कामाला लागलेलो. पोस्ट प्रोडक्शन सुरू होतं. मला विराजस म्हणाला की चला २ दिवस आम्ही चाललोय आणि नेमकं तेव्हा मला डबिंगचं काहीतरी आलं. मला काहीतरी पटत नव्हतं. मी म्हणालो, नाही मला हे पटत नाहीये मी विऱ्याला फोन करणार.'
पुढे आशय म्हणाला, 'हा नेमका शिवणीसोबत तिकडे होता. मला माहीत होतं. पण मला पण असं झालं की काय करणार मी स्टुडिओमध्ये उभा आहे. मला पर्याय नाही. तिथे याला रेंज नाही. ऐकू येत नाही तर याने १५ वेळा फोन केला. शेवटी मेसेज केले. असं खूप वेळ चालू होतं. शेवटी शिवानीचा मला मेसेज आला की ऐक ना, आम्ही लग्नानंतर खूपच दिवसांनी बाहेर आलोय. आजचे २ दिवस तरी त्याला दे ना प्लिज. मी रिक्वेस्ट करते. प्लिज. मी म्हटलं की अगं मी माइकसमोर उभा आहे पण मी सोडून दिलं. म्हटलं जाऊदे. डबिंग झालं उत्तम झालं. लग्न झाल्यानंतर असे बदल होतात.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.