'बिग बॉस 16' फेम अब्दू रोजिक हा चाहत्यांचा लाडका आहे. काही महिन्यांपूर्वी अब्दूने साखरपुडा केला होता. त्याचे फोटोही त्याने चाहत्यांसोबत शेअर केले होते. काही महिन्यातच तो लग्न करणार होता. 7 जुलै रोजी त्यांचं लग्न होणार होतं. पण आता त्याचं लग्न मोडलं आहे. अब्दूने सांगितलं की, त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं नातं होतं. पण एका गोष्टीमुळे त्याने लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याने स्वतः हे कारण सांगितलं आहे.
'ईटाईम्स'शी बोलताना अब्दू रोजिक म्हणाला, 'आमचं नातं जसजसं पुढे जात होतं, तस तसं आमच्यातला सांस्कृतिक फरक आम्हाला जाणवू लागला. त्यामुळे मला निर्णय बदलावा लागला. माझ्या आयुष्यात मला दररोज किती अडचणी येतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणारा आणि पुढच्या प्रवासात त्याला साथ देणारा जोडीदार मला हवा आहे.'
तो पुढे म्हणाला, 'स्वत:च्या बळावर मी हे स्थान मिळवलं. त्याचं सर्व श्रेय मी स्वत:ला देतो. सर्वांनी मला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे मी प्रसिद्ध झालो. मी भेटलेल्या प्रत्येकाशी चांगले संबंध ठेवले आहेत आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मला खात्री आहे की योग्य वेळ आल्यावर मला पुन्हा माझं प्रेम मिळेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानतो.'
अब्दू रोजिकने एप्रिलमध्ये शारजाह, यूएईमध्ये अमीरासोबत एंगेजमेंट केली होती. २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांची एंगेजमेंट झाली. २० वर्षांचा अब्दू ७ जुलै रोजी १९ वर्षांच्या अमीराती मुलीशी लग्न करणार होता. पण बॉक्सिंगच्या सामन्यामुळे त्याने लग्न पुढे ढकललं. तो सामना हरला. आणि आता त्याने लग्नही मोडलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.