'आभाळमाया'च्या त्या सीनचा मनोज जोशी यांच्या पत्नीच्या मनावर झालेला परिणाम; मध्यरात्री केलेला सुकन्या यांना फोन

Sukanya Mone Talked About Abhalmaya Serial: 'आभाळमाया' या मालिकेच्या काही आठवणी सुकन्या मोने यांनी सांगितल्या आहेत. जेव्हा मनोज जोशी यांच्या पत्नीने त्यांना रात्री फोन केला होता.
abhalmaya
abhalmaya esakal
Updated on

छोट्या पडद्यावर अनेक मालिका लोकप्रिय ठरल्या. यात बहुतांश मालिका या झी मराठीच्या होत्या. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशीच एक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'आभाळमाया' या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेची कथा आणि कलाकार दोन्ही प्रचंड गाजले. आता झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेच्या सुवर्ण क्षणांना उजाळा देण्यात आला. या सोहळ्यात मंदार देवस्थळी यांनी या मालिकेतील सर्वोत्कृष्ट सीन सांगितला. आणि तोच सीन पाहून मनोज जोशी यांच्या बायकोने थेट सुकन्या मोने यांना फोन केला होता तोही रात्री २ वाजता.

कोणता होता तो सीन

मंदार यांनी तो सीन सांगितला ज्यात मालिकेतीलशरद जोशी म्हणजे मनोज रात्री ९ वाजता घरी येतो आणि सुधा जोशी म्हणजे सुकन्या त्याला २ वाजता घराबाहेर काढते. ११ पानांचा हा सीन शूट झाला होता.' त्यानंतर सुकन्या मोने म्हणतात, 'मालिकांमधील सीनचा किती प्रभाव पडतो लोकांच्या मनावर. त्यादिवशी मनोजची बायको आली होती शूटिंग बघायला. त्यांना लग्नाला जायचं होतं. ती सीन बघत होती तो. एका पॉईंटला ती म्हणाली की चल आपण घरी जाऊया. लग्नाला वगरे नको जाऊया. पुन्हा घरी जाऊया. इतका तिच्या मनावर त्याचा परिणाम झाला होता. तिने रात्री २ वाजता मला फोन केला.'

काय म्हणाल्या मनोज जोशींच्या पत्नी?

पुढे सुकन्या म्हणाल्या, 'तुझं आणि मनोजचं खरंच काही नाहीये ना? म्हटलं असं का विचारतेस चारू, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत. ती म्हणाली, म्हणूनच विचारते. मला टेन्शन आलंय. माझी चित्रा नाईक नाही ना करणार तुम्ही? इतका तिच्या मनावर परिणाम झाला या गोष्टीचा की ती लग्नाला गेली नाही. एक आठवडा भर तिच्या मनावर तो परिणाम होता. की असं खरंच या दोघांचं काही चालू नाहीये ना.'

कोण होती चित्रा नाईक

मालिकेत चित्रा नाईक हे पात्र अतिशा नाईक यांनी साकारलं होतं. शरद विवाहित असतानादेखील चित्राच्या प्रेमात पडतो आणि सुधाशी प्रतारणा करतो. त्यांना एक मुलगीही होते. त्यांच्याबद्दल कळल्यावर सुधा शरदला घराबाहेर जायला सांगते. असं असतानाच चित्राचं निधन होतं. मात्र या सगळ्यात त्या मुलीची काहीही चूक नाही हे जाणून सुधा शरद आणि चित्राच्या मुलीचा सांभाळ करते.

abhalmaya
तिच्यासारख्या लोकांसोबत... जेव्हा अमृता सिंगने रवीना टंडनला दिलेली शिवी; सैफ अली खान ठरलेला कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.