लोकप्रिय मराठमोळा गायक अभिजित सावंत सध्या 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात धुमाकूळ घालतोय. त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक आठवड्यात वेगळा गेम खेळणारा अभिजीत स्वतःच्या डोक्याने चालतोय हे त्याने सिद्ध केलंय. अभिजीतने त्याच्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. 'इंडियन आयडल' सीझन १ चा विजेता झाल्यानंतर त्याचं 'मोहोब्बते लूटाऊंगा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या गाण्याने आणि कार्यक्रमाने त्याला घराघरात पोहोचवलं. त्यावेळेस स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला मातोश्रीवर बोलावलं होतं. तेव्हा त्यांचं वागणं पाहून स्वतः अभिजीत भारावला होता. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्यापूर्वी अभिजीतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, 'मी घरी गेलेलो, मातोश्रीवर गेलेलो. मोठ्या साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावलेलं. मुळात कलाकारांची त्यांना खूप आवड होती. त्यांना कलाकारांबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. त्यांनी घरी बोलावलं. त्यांच्या घरातल्या फर्स्ट फ्लोअरवर आम्ही सगळे बसलो होतो. ते माझ्याशी बोलले, त्यांनी मला उपदेश दिले. गीष्टी केल्या की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. त्यांनी पूर्ण फॅमिलीला बोलावलं. त्यांनी संपूर्ण ठाकरे फॅमिली समोर उभी केली. त्यांनी स्वतः ओळख करून दिली. हे माझे आई- वडील असं म्हणाले.'
तो पुढे म्हणाला, 'त्यांनी अशी ओळख करून देणं म्हणजे मला एकदम भरून आलं. आम्ही वोट करायचो ज्यांच्यासाठी, ज्यांना आम्ही तारणहार समजायचो, महाराष्ट्राचं चांगलं हेच करणार असे विचार होते, आपके आवडीचे पॉलिटिशियन वगरे आणि आता तेच आपल्याला ओळख करून देतायत, हा बघ हा, त्याचं नाव हे असं, आणि तो एक वेगळाच अनुभव होता.' यासोबतच या मुलाखतीत अभिजीतने त्याला मराठी सिनेसृष्टीने डावलल्याचं सांगितलं. कामासाठी आपल्याकडेच पैसे मागितले गेले असंही तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.