गेले कित्येक महिने अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. मध्यंतरी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही सुरू होत्या. मीडिया रिपोर्ट्स नुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात आता पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाही. ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याचं समोर आलं होतं. तर आकाश अंबानी याच्या लग्नालाही बच्चन कुटुंबाने आणि ऐश्वर्याने वेगवेगळी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात मतभेद आहेत हे चित्र अगदी स्पष्ट झालं. यासगळ्यासाठी आधी जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा यांना जबाबदार धरलं जात होतं. मात्र आता गोष्टीची दुसरी बाजूही समोर येते आहे. अभिषेक एका दुसऱ्याच अभिनेत्रीला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय.
या चर्चांमध्ये अभिषेकचं नाव त्याच्या एका सह -अभिनेत्रीशी जोडलं जात आहे, जिने त्याच्यासोबत 'दसवी' चित्रपटात काम केलं होतं. इतकंच नाही तर या अभिनेत्रीलाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 'लंचबॉक्स' सारख्या अप्रतिम चित्रपटात दिसलेली निम्रत कौर आहे. नुकताच निम्रतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्याच्या कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल गेलं होतं. तिचे चाहते तिच्यावर नाराज आहेत. निम्रत आणि अभिषेक हे 'दसवी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जवळ आल्याचं बोललं जातंय. मात्र याबद्दल अभिषेक बच्चनने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
निम्रतच्या व्हिडिओवर मात्र नेटकरी तिला सतत तू खरंच अभिषेकला डेट करत आहेस का असा प्रश्न विचारताना दिसतायत. त्यांच्यातील नातं खरं आहे की अफवा हे समोर आलेलं नसलं तरी ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांचे चाहते या गोष्टीमुळे चांगलेच नाराज आहेत. तर दुसरीकडे कितीही मतभेद असले तरी बच्चन कुटुंबाचं नाव जपण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार नसल्याचं सांगितलं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.