प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांना नोटीस; लाखोंचे ९ चेक झाले बाउन्स, कोटींची आहे थकबाकी

Akshay Bardapurkar Get legel Notice For Check Bounce : प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. लाखो रुपयांचे ९ चेक बाउंस झाल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.
akashay bardapurkar got legal notice
akashay bardapurkar got legal noticeesakal
Updated on

प्लॅनेट मराठी या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येते आहे. मराठी चित्रपटांना हक्काचा ओटीटी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून प्लॅनेट मराठीची निर्मिती करणारे अक्षय बर्दापूरकर यांना आता कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी समोरच्याला दिलेले तब्बल ९ चेक बाउन्स झाले आहेत. ज्याची किंमत लाखोंमध्ये होती. आता हे चेक बाउन्स प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

मार्स कम्युनिकेटर्स या पीआर एजन्सीचे सहसंस्थापक आयुष आणि मौसम शाह यांचे मे महिन्यापासून दर महिन्याचे ३ लाख ६१ हजार ५०० रुपये म्हणजेच एकूण १ कोटी १४ लाख ३० हजार रुपये अक्षय यांच्याकडे थकीत होते. त्यातील २० लाख मौसम यांचे होते तर ८७ लाख आयुष यांचे होते. बर्दापूरकर यांनी स्वतःच्या हाताने ९ सह्या केलेले चेक आयुष आणि मौसम यांच्याकडे सुपूर्त केले होते. मात्र हे सगळे चेक बाउंस झाल्याने आयुष आणि मौसम यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता या दोघांनीही बर्दापूरकर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

याबद्दल बोलताना आयुष म्हणाले, 'ही आर्थिक अडचणीपेक्षा मोठी अडचण आहे. विश्वासघात आहे. व्यवसाय हा विश्वासावर केला जातो जेव्हा तुमचा विश्वास तुटतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त व्यवसायावरच होत नाही तर वैयक्तिक नातेसंबंधांवरदेखील होतो. हे सगळं निराशाजनक आहे. व्यावसायिक संबंध सुरू करताना, परस्पर आदर आणि सचोटी या मूलभूत गोष्टी आहेत . आम्ही हे पाऊल केवळ आमच्या व्यवसायाला डोळ्यासमोर ठेवून उचललेलं आहे.'

यावर अक्षय बर्दापूरकर यांनी हे वृत्त फेटाळले असून या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

akashay bardapurkar got legal notice
सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकास ओरिजिनलची पहिली सीरिज ‘IPC’; 'या दिवशी होणार प्रदर्शित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.