Bangladesh Violence: बांगलादेशात जमावाकडून लोकप्रिय अभिनेत्याची हत्या; वडिलांचाही घेतला जीव, कारण फक्त एवढंच की...

Actor Murdered In Bangladesh Violence: लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेत्याची बांगलादेशात जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे टॉलिवूड हादरलं आहे.
shanto khan death
shanto khan death esakal
Updated on

बांगलादेशातील आंदोलन आणखी चिघळलं आहे. दररोज नवीन हिंसाचाराच्या घटना कानावर येत आहेत. या घटनांमुळे अख्खा देश हादरला आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तिथली परिस्थिती आणखीनच बिकट होत आहे. लष्कराने देश ताब्यात घेतला असला तरी त्यांचंही नियंत्रण कमी पडताना दिसत आहेत. दररोज हजारो लोक मारले जात आहेत. त्यातच आता बांगलादेशातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. या हिंसाचारात संतप्त जमावाने लोकप्रिय बांगलादेशी अभिनेता आणि दिग्दर्शकाची मारून हत्या केली आहे. सोबतच त्याच्या वडिलांनाही ठार केलं आहे.

बांगलादेशमधील प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील निर्माते-दिग्दर्शिक सलीम खान अशी या सेलिब्रिटींची नावे असून जमावाने केलेल्या मारहाणीत त्यांना जीव गमवावा लागला. जमावाने बेदम मारहाण केल्याने त्यांचा जीव गेला. मीडिया रिपोर्टनुसार शांतो आणि सलीम त्यांचा जीव वाचवण्यासाठी घरातून पळून जाण्याच्या तयारीत होते आणि त्याचवेळी भडकलेल्या जमावाने त्यांना गाठले. तेव्हा त्यांनी गोळ्याही झाडल्या, मात्र पुन्हा दुसऱ्या वाटेत जमावाने त्यांना गाठलं आणि दोघांनाही मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित 'तुंगीपारर मियाँ भाई' हा बांगलादेशी चित्रपटही सलीम यांनी दिग्दर्शित केला होता. शेख हसीना या मुजीबूर रहमान यांच्या कन्या आहेत. त्यांनी 'सलीम शहेनशाह', 'विद्रोही' सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ते पद्म मेघना नदीतून अवैध वाळू उत्खनन प्रकरणातही दोषी आढळले होते आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला.

shanto khan death
लग्नानंतर मुलं नको म्हणणाऱ्या जोडप्यांना किशोरी शहाणेंची शेलक्या शब्दात समज, म्हणाल्या- तुम्ही कधीपर्यंत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.