'मनमौजी' मधून रिया नलावडेची मराठी चित्रपटात दमदार एंट्री; म्हणते- मी या क्षेत्रात आल्याने अनेकांना धक्का

Ria Nalawade On Her Movie Manmauji: रिया सध्या तिच्या आगामी चित्रपट मनमौजीसाठी चर्चेत आहेतिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगताना रियाने तिच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला
riya naalawade
riya naalawade esakaal
Updated on

अभिनेत्री रिया नलावडे सध्या तिच्या आगामी चित्रपट मनमौजीसाठी चर्चेत आहे. तिचा मनमौजी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या आधी तिने यूपी६५, कॅडेट्स आणि सन्फ्लॉवर या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. मनमौजी या रोमँटिक कॉमेडी असलेल्या चित्रपटात रिया मीरा नावाच्या प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी मुलीची भूमिका साकारत आहे, जी श्री नावाच्या मुलाच्या कंपनीत पार्टनर म्हणून येते. श्रीला मुली आवडत नसतात, आणि या दोघांमध्ये कसे मतभेद होतात आणि कसे प्रेम जुळते, हेच चित्रपटात पाहायला मिळेल. "मी मीरासारखीच आहे. माझ्यासारखं तिचंही जे मनात आहे तेच तोंडावर बोलते!" अशी ती म्हणाली.

तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगताना रियाने तिच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "मी आई-वडिलांची एकमेव मुलगी. माझे वडील मूळचे निपाणीचे आणि ते व्यापारी आहेत तर आई कॉर्पोरेट क्षेत्रात होती. माझा जन्म पुण्यात झाला, आणि बालपण बंगलोरला गेले." शाळेत असतानाच रियाने टाइम्स फ्रेश फेस स्पर्धा जिंकली, ज्यामुळे तिला कन्नड चित्रपटांतून ऑफर मिळायला लागल्या. पुढे सिनेमा क्षेत्राची आवड निर्माण झाल्यामुळे ती मुंबईला आली, आणि इथं येऊन डान्स क्लासेस तसेच व्हिस्लिंग वूड कॉलेजमध्ये पटकथा लेखनात शिक्षण घेतलं. तिचं म्हणणं आहे की, सत्यांशू सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे तिला पटकथा लेखनाचे खूप काही शिकायला मिळाले.

प्रथम कॅमेरा फेस करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली, "मी पहिल्यांदा एका ब्रँड साठी कॅमेरा फेस केला. पण कॅमेरा लवर असल्यामुळे भीतीचा प्रश्नच नव्हता!" मनमौजीच्या सेटवर प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम यांच्यासोबत काम करताना मात्र ती थोडी घाबरली होती. "पण दिग्दर्शिका शीतल शेट्टी आणि प्रोड्युसर विनोद मलगेवार यांचं खूपच सहकार्य मिळालं, त्यामुळे सेटवरची नर्व्हसनेस जणू नाहीशीच झाली." असेही ती म्हणाली.

riya naalawade
स्नेहलने स्वयंपाक केला आणि १५ दिवस कुणीच... प्रवीण तरडेंनी सांगितला लग्नानंतरचा धमाल किस्सा, म्हणाले- आईने तिला

तिच्या पहिल्या चित्रपटाविषयी ती विशेष उत्साही आहे. ती म्हणाली, "माझा पहिला चित्रपट मराठीत येतोय, याचा मला खूप अभिमान आहे. बालपण बंगलोरमध्ये गेल्यामुळे माझं मराठी खूप चांगलं नाही, पण आता तो आत्मविश्वास आहे की, मी मोठ्या पडद्यावर माझं काम उत्तम सादर करू शकेन." तिच्या कुटुंबातील प्रतिक्रिया विचारल्यावर रियाने सांगितलं, "काहींना वाटलं होतं हे होणारच होतं, पण बऱ्याच जणांना धक्का बसला. आमच्या घरात बहुतेक जण बिझनेस, शेती किंवा इंजिनिअरिंग मध्ये आहेत. या क्षेत्रात कुणीही नव्हतं, त्यामुळे मला ते स्वप्न पूर्ण करावं लागलं!"

आणि यावर थांबत न राहता, रियाने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहितीही दिली. मनमौजीनंतर ती तीन पायांचा घोडा या चित्रपटात दिसणार आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून गाजला आहे. शिवाय, रिया ‘वहेम’ या हिंदी चित्रपटातून अध्ययन सुमन आणि विजय राज यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. तसेच काजोल सोबतदेखील ती ‘द ट्रायल: सीझन २’ या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे.रिया नलावडेची ही नवी सुरुवात आणि तिचे उत्साही प्लॅन्स पाहता, तिने मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

riya naalawade
आई कुठे काय करते पाठोपाठ स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार निरोप; सुरु होतेय नवी मालिका, नाव माहितीये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.