मराठवाड्यातील हनुमंतच्या आयुष्यावर आधारित आहे प्रियांका चोप्राचा 'पाणी'; भेटा प्रेमासाठी काहीही करणाऱ्या हिरोला

Paani Movie Real Story Depend On Hanuman Kendre Life : अभिनेता आदिनाथ कोठारे याच्या 'पाणी' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारलेला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
pani movie
pani movie esakal
Updated on

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याचा 'पाणी' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी आदिनाथला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटाच्या नावावरून आणि टीझरवरून हा चित्रपट पाण्याविषयीच्या लढ्यावर आहे हे स्पष्ट होतं. मात्र हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा संपूर्ण चित्रपट मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या जलदूताच्या आयुष्यावर आधारलेला आहे ज्याने आपल्या प्रेमासाठी घरातच नाही तर संपूर्ण गावात पाणी आणलं. वाचा त्याची कथा.

प्रेमाला मिळवण्यासाठीच मिशन

अजूनही मराठवाडा आणि पाणी हे दोन विरुद्ध शब्द आहेत. मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. तिथले अनेक लोक पाण्यामुळे गाव सोडून शहरांकडे वळाले. अशातच हनुमंत यांच्या लग्नाचा विषय निघतो. मुलामुलींची पसंतीदेखील होते मात्र पाणी आणण्यासाठी तब्बल ४ किलोमीटर जावं लागत असल्याने ती मुलगी पाणी आल्यानंतर लग्न करू असं सांगते. आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी हनुमंत एका वेगळ्या मिशनवर जायचं ठरवतात. ते आपल्या गावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. ते संपूर्ण गावाला गोळा करून पाणी संवर्धन कसं करायचं हे शिकवतात. स्थानिक गुंड ते पैशांची अडचण या सगळ्याला घाबरून न जाता ते त्यांचं काम सुरूच ठेवतात.

लढा आणि यश

आज त्यांचं गाव नागदरवाडी हे फक्त टँकर मुक्त नाहीये तर त्यांच्या गावातून इतर १२ गावांना पाणी पुरवठा केला जातो. आमिर खान याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात २०१२ मध्ये हनुमंत यांची कथा दाखवण्यात आली होती. त्यानंतर ४० हजारहून अधिक लोकांनी त्यांच्या गावाला भेट दिली होती. १०० हुन अधिक गावात नागदरवाडीचं पाणी मॉडेल राबवलं गेलं. त्यानंतर तेथील स्त्रियांनी या योजनेमुळे आपलं आयुष्य सुसह्य झाल्याचं सांगितलं.

आता हनुमंत यांचा संपूर्ण प्रवास 'पाणी' मधून दिसणार आहे. या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील हे कलाकार आहेत. ‘पाणी’ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

pani movie
Tumbbad Box Office: 'तुंबाड'ने गाजवला वीकेंड! तीन दिवसात कमावले 'इतके' कोटी; करीनालाही टाकलं मागे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.