बिग बॉस फेम अदनान शेखची पत्नी आहे मराठी; लग्नासाठी रिद्धीची झाली आयेशा? बहिणीनेच शेअर केले फोटो

Adnan Sheikh Wife Real Name: 'बिग बॉस ओटीटी' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अदनान शेख याची पत्नी मराठी असल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं आहे.
adnan shikh
adnan shikh
Updated on

'बिग बॉस ओटीटी' च्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकलेला लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अदनान शेख याने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. हे लग्न अतिशय थाटामाटात पार पडलं. अदनानच्या लग्नाला त्याचा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती सना मकबूल याशिवाय त्याचे बिग बॉस मधील मित्र मैत्रिणी या लग्नात हजर होते. तर बिग बॉस मराठीमधून घराबाहेर झालेला अरबाज पटेलदेखील या लग्नात पोहोचला होता. मात्र लग्नात अदनानने त्याच्या पत्नीच्या चेहरा दाखवला नव्हता. ती स्वतः तिचा चेहरा दाखवण्यास तयार नव्हती. आता अदनानच्या बहिणीनेच त्याच्या पत्नीबद्दल मोठा खुलासा केला आहे, अदनानची पत्नी हिंदू असून ती मराठी आहे असं तिने सांगितलं आहे. तर त्याच्याशी लग्नासाठी तिने धर्मही बदलला असल्याचं तिने म्हटलंय.

बहिणीने केलेला मारहाणीचा आरोप

काही दिवसांपूर्वीच अदनानची बहीण इफत हिने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत होता. आता त्याच्या बहिणीने त्याच्या पत्नीबद्दल मोठा खुलासा केला आहे, त्याची पत्नी मराठी मुलगी असून तिने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचं तिने सांगितलंय.

रिद्धीची झाली आयेशा

अदनानच्या बहिणीने असा दावा केलाय की, अदनानची पत्नी ही हिंदू असून तिचं आधीचं नाव रिद्धी जाधव असं आहे. रिद्धीने अदनानशी लग्न करण्याआधी तिचा धर्म बदलला. अदनानशी लग्न करण्यासाठी रिद्धीने इस्लाम धर्म स्वीकरला असून तिने स्वतःचं नावही बदललं आहे. रिद्धी हे नाव बदलून तिने आयशा हे नाव ठेवलंय. आता अदनानच्या बहिणीने थेट इंन्स्टाग्रामवर अदनानच्या पत्नीचा फोटो दाखवत तिच्या पुर्वायुष्याबद्दल खुलासा केलाय.

लग्नात मीडिया आणि इतर नातेवाईकांसमोर अदनानची पत्नी मास्क लावून फिरत होती. आता पत्नी खरंच हिंदू असून तिने लग्नासाठी धर्म बदलला का? याविषयी अदनान स्वतः काय खुलासा करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

adnan shikh
मुलाच्या निधनाचा धक्का अन् डॉ. लागूंनी मागितली नाटकातल्या कलाकारांची माफी; वंदना गुप्तेंनी सांगितलं नेमकं काय घडलेलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.