नेमकं प्रकरण काय? ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर त्याच्या ग्रुपमधील गिटारीस्ट मोहिनी डेदेखील पतीपासून विभक्त

A R Rahman Guitarist Mohini Dey Divorce: ए आर रहमान याच्या घटस्फोटानंतर त्याच्या ग्रुपमधील गिटारिस्ट देखील तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. यावरून नेटकरी देखील बुचकळ्यात पडलेत.
a r rahman
a r rahmanesakal
Updated on

संगीतकार एआर रहमान यांनी १९ नोव्हेंबर रोजी पत्नी सायरा बानोपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र आता आणखी एक गोष्ट घडलीये जी पाहून नेटकऱ्यांच्या देखील भुवया उंचावल्यात. रहमानच्या ग्रुपची बेस गिटारिस्ट मोहिनी डे हिनेही तिच्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने एक पोस्ट करत याबद्दल सांगितलंय. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने खुलासा केला की ती पती मार्क हार्टशसोबतचं तिचं लग्न संपवतेय. ए आर रहमानच्या घटस्फोटाच्या पोस्टनंतर काही तासातच मोहिनीने ही पोस्ट केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.