याला म्हणतात संस्कार! अवॉर्ड फंक्शनमध्ये आराध्याचं वागणं पाहून सगळेच झाले चकीत; ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणाले...

Aaradhya Bachchan Viral Video With Shiva Rajkumar: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातमीमध्ये एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
aishwarya rai
aishwarya rai esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याची ओळख आहे. आजही तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री फिक्या आहेत. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असल्या तरी अभिनेत्री वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना दिसते. ती प्रत्येक ठिकाणी मुलगी आराध्यालादेखील सोबत घेऊन जाते. अशाच एका अवार्ड फंक्शनमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी आराध्यावर फिदा झालेत तर ऐश्वर्याच्या संस्कारांचं कौतुक करतायत. वाचा असं आराध्याने नेमकं काय केलंय.

आराध्याने नेमकं केलंय तरी काय?

नुकताच SIIMA 2024 पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याने आराध्यासोबत हजेरी लावली होती. दुबईतील कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात आराध्या चक्क सगळ्यांसमोर अभिनेता शिवा राजकुमार याच्या पाया पडताना दिसतेय. मानव मंगलानी यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ऐश्वर्या आराध्या आणि अभिनेता चियान विक्रमसोबत उभी आहे. तर त्यांच्यासमोर अभिनेते शिवा राजकुमार येतात. शिवा राजकुमार हे कन्नड सिनेसृष्टीतील मोठे अभिनेते आहेत. तर ते दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार याचे मोठे भाऊ आहेत. त्यांना पाहताच ऐश्वर्या हात जोडते. जेव्हा ते आराध्यासोबत हात मिळवण्यासाठी हात पुढे करतात तेव्हा आराध्या हात जोडून त्यांना नमस्कार करते.

ती त्यांचं हसून स्वागत करते आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकते. त्यांच्या पाया पडते. शिवा तिला उठवतात. हे पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'हेच संस्कार आहेत.' दुसऱ्याने लिहिलं, 'तिच्या वयाच्या मानाने तिचे संस्कार खूप मोठे आहेत.' आणखी एकाने लिहिलं, 'वडील चित्रपटात बिझी आहेत, आजोबा केबीसीमध्ये हे आईचे संस्कार आहेत. ऐश्वर्या आज आई म्हणूनही जिंकली आहे.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

aishwarya rai
डीपीने टाकलं सुरजला मागे अन्... बिग बॉसच्या घरातील सगळ्यात लोकप्रिय स्पर्धक कोण? वाचा कोण कुठल्या स्थानावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.