बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं चित्र आहे. ते दोघे याबद्दल काहीही बोलण्यास तयार नसले तरी त्यांच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतं. ऐश्वर्याच्या वाढदिवसाला हजर न राहण्यासाठी अभिषेकने आजीच्या आजारपणाचं कारण दिलं असलं तरी त्यामुळे त्यांच्यात दुरावा नाही हे मुळीच सिद्ध झालेलं नाही. याशिवाय तो त्याच्या आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चांबद्दल काहीही बोलण्यास तयार नाही. बच्चन कुटुंबाने अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याला दिलेली वागणूक सगळ्यांनीच पाहिली. त्यामुळे केवळ अभिषेकचं नाही तर सासूबाई जया बच्चन यांच्यासोबतही ऐश्वर्याचं नातं आता फारसं चांगलं राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं. मात्र अशी नेमकी काय कारणं आहेत ज्यामुळे त्या दोघींमध्ये दुरावा आलाय.
जेव्हा ऐश्वर्याने 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात रणबीर कपूरससोबत बोल्ड सीन्स दिले होते तेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंब तिच्यावर नाराज होतं असं म्हटलं गेलं. तेव्हा ऐश्वर्याने मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार सोहळ्यांना बच्चन कुटुंब सातत्याने ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करताना दिसलं. यापूर्वी जेव्हा जया यांना आपल्या सुनेबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्या तिला बेस्ट फ्रेंड म्हणाल्या होत्या. आम्ही दोघीही एकमेकांना मैत्रिणी मानतो. मला काही आवडलं नाही तर मी सांगते आणि तिला आवडलं नाही तर ती सांगते. फक्त तिला माझा मान ठेवावा लागतो कारण मी म्हातारी आहे असं जया म्हणाल्या होत्या.
मात्र त्यानंतर अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा सासर सोडून माहेरी राहू लागली आणि बच्चन कुटुंबात उभी फूट पडली. जया यांचा स्वभाव फटकळ असल्याने आधी ऐश्वर्या त्यांना सांभाळून घेत होती असं सांगितलं जातं. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता घरी आल्यानंतर ऐश्वर्याला त्या दोघींना सांभाळणं अवघड झालं. सासू सुनेच्या नात्यात दुरावा येण्याचं मुख्य कारण हे श्वेता नंदा असल्याचं सांगितलं जातं.
तर दुसरीकडे अभिषेकचे सातत्याने फ्लॉप होणारे चित्रपट पाहता बच्चन कुटुंबावर नेहमीच ऐश्वर्याच्या लोकप्रियतेचा पगडा राहिलाय. अभिषेक अनेकदा रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा अपमान करत तिला एकटीला सोडून जाताना दिसलाय. त्यामुळे अभिषेकलादेखील कुठेतरी पत्नीच्या जास्त यशस्वी असण्याचा त्रास होतो असं म्हटलं जातं. हिच गोष्ट श्वेता नंदा हिला लागू होते. त्यामुळे बच्चन कुटुंबियांकडून अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी पाहायला मिळाल्या ज्यात त्यांनी उघडपणे ऐश्वर्याचा अपमान केला. मात्र ऐश्वर्याने कधीही आपला तोल ढळू दिला नाही तर ती नेहमी त्यांची बाजू सावरताना दिसली.
श्वेता नंदा आल्यापासून बच्चन कुटुंबातील गोष्टी आणखीनच बदलल्या असल्याचं बोललं जातं. तर सासू सुनेच्या नात्यातही या छोट्या छोट्या गोष्टींमुळे खडा पडल्याचं दिसून आलं. ऐश्वर्याने यासगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली नसली तरी ते दोघे आता एकत्र नसल्याचं चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.